शिक्रापूर -शिक्रापूरसह परिसरात मंगळवारी (दि. 11) रोजी 24 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शिक्रापुरात 11, तळेगाव ढमढेरेत 7, धानोरेत 2, कोरेगाव भीमात 3 तर सणसवाडीत 1 असे तब्बल 24 करोनाबाधित रुग्ण एकाच दिवशी आढळून आले आहेत. त्यामध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा समावेश आहे.
शिक्रापूरसह आजूबाजूच्या आदी गावांमध्ये नियमितपणे करोना बाधित आढळून येत आहेत. शिक्रापूर येथे तब्बल 11 तर एकाच घरातील 6 व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
शिरूर शहरात 6 जणांना करोना
शिरूर – शहरातील सैनिक सोसायटी, भाजी बाजार, मारुती आळी, हुडको कॉलनी या 4 भागात 6 बाधित आढळले आहेत.शहरातील भाजी बाजार येथील तरुण, सैनिक सोसायटी येथील पुरुष, महिला, मारुती आळी येथील पुरुष, भाजी बाजार येथील महिला, तर हुडको कॉलनी येथील 90 वर्षीय पुरुष असे एकूण 6 करोनाबाधित आढळले आहेत. यामुळे शहरातील बाधितांचा एकूण आकडा 127 झाला आहे.