सातारा – जिल्ह्यात सोमवारी (दि. 10) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार 174 जण करोनाबाधित आले आहेत तर बारा करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. मृतांमध्ये सातारा तालुक्यातील चार, कराड तालुक्यातील तीन, पाटण व फलटण तालुक्यातील प्रत्येकी दोन व खटाव तालुक्यातील एका बाधिताचा समावेश आहे.
काले, ता. कराड येथील 30 वर्षांची महिला, पाटणमधील 54 वर्षीय पुरुष, चोरे, ता. कराड येथील 57 वर्षीय महिला, सातारा येथील शनिवार पेठेतील 73 वर्षीय पुरुष, सोनापूर, ता. सातारा येथील 92 वर्षांची महिला, सांगूर, ता. पाटण येथील 40 वर्षीय पुरुष, वडगाव, ता. खटाव येथील 71 वर्षीय पुरुष, फलटणच्या सोमवार पेठेतील 56 वर्षीय पुरुष, शहरातील 70 वर्षीय महिला या बाधितांचा सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेली शनिवार पेठ (कराड) येथील 68 वर्षीय महिला, व्यंकटपुरा पेठ, सातारा येथील 48 वर्षीय पुरुष, जकातवाडी, ता. सातारा येथील 74 वर्षीय पुरुष यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींची एकूण संख्या 192 झाली आहे.
त्याचबरोबर सातारा तालुक्यातील कोडोली येथील तीन महिला, दोन पुरुष व 7, 3 वर्षांच्या बालिका, नागठाणे एक पुरुष, सातारा शहर तीन महिला, चार पुरुष, न्यू विकासनगर एक पुरुष, संभाजीनगर एक महिला, भोंदवडे दोन महिला
जकातवाडी तीन पुरुष, 3, 10 वर्षांची मुले, 15, 11 वर्षांच्या दोन मुली व तीन महिला, वाढे एक महिला, कोंढवली एक पुरुष, कराड शहर वीस पुरुष, दहा महिला, 13 वर्षांची बालिका, कराड तालुक्यातील सैदापूर दोन महिला, कार्वे एक पुरुष, एक महिला, भोसलेवाडी एक महिला, वडगाव हवेली एक पुरुष, कापिल एक पुरुष
बेलदरे एक पुरुष, कोळे एक महिला, एक पुरुष, जिंती एक पुरुष, कोपर्डे हवेली एक पुरुष, ओंड एक पुरुष, काले एक महिला, इंदोली एक पुरुष, मलकापूर दोन पुरुष, एक महिला, बनवडी एक पुरुष, आगाशिवनगर एक पुरुष, हणबरवाडी 7 वर्षांची बालिका, येणके एक पुरुष, गोटे एक महिला, चोरे तीन पुरुष, एक महिला, मसूर तीन महिला, किवळ एक महिला, दोन पुरुष, उंब्रज दोन पुरुष, आटके एक महिला, ब्राह्मणवाडी एक पुरुष, बेलवडे बुद्रुक एक पुरुष, महाबळेश्वर शहर 7 वर्षांची बालिका
4 वर्षांचे बालक, एक महिला, दोन पुरुष, महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली एक पुरुष, गोगवे एक पुरुष, कोरेगाव तालुक्यातील शांतीनगर एक पुरुष, हिवरे एक महिला, कोरेगावमधील एक पुरुष, रहिमतपूर येथील एक पुरुष, एक महिला, वाठार किरोली एक युवक, विद्यानगर एक महिला, एक पुरुष, देऊर एक महिला, पाटण एक महिला, एक पुरुष, पाटण तालुक्यात वजरोशी एक महिला
गारवडे एक पुरुष, बेलवडे एक महिला, जमदाडेवाडी एक पुरुष, खटाव तालुक्यात वडूज चार महिला, दोन पुरुष, पळसगाव एक पुरुष, पुसेगाव एक महिला, एक पुरुष, पळशी एक महिला, खंडाळा तालुक्यात धनगरवाडी तीन पुरुष, एक महिला, लोणंद दोन महिला, दोन पुरुष, 4 वर्षीय बालक, खंडाळा तीन पुरुष, दीड व सहा वर्षांची बालके, दोन महिला, 13 वर्षांची मुलगी, शिरवळ एक युवती, 16 वर्षांची मुलगी
एक युवक, फलटण तालुक्यात तामखडे एक पुरुष, मिरडे एक पुरुष, फलटण शहर चार पुरुष, एक महिला, 11 वर्षांचा मुलगा, जावळी तालुक्यात मार्ली एक युवक, सरताळे एक युवक, माण तालुक्यात म्हसवड दोन पुरुष, एक महिला, वाईतील 11 वर्षांची मुलगी. बावधन एक महिला, पुणे जिल्ह्यातील खराडी 7 वर्षीय बालक, कोल्हापूर एक युवक, चिपळूण एक महिला, अशा 174 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
663 जणांचे नमुने तपासणीला
जिल्हा रुग्णालयातील 54, कराड येथील 12, कोरेगाव 17, वाईतील 63, शिरवळ येथील 88, रायगावमधील सहा, पानमळेवाडीतील 130, मायणीतील 60, महाबळेश्वरमधील 70, पाटणमधील 17, खावलीतील 39, ढेबेवाडीतील 17 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 90, अशा एकूण 663 जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीस पाठविले आहेत.