वाघोली (पुणे) – शहरात कोरोना विषाणूंच्या पाश्वर्भूमीवर सर्वत्र काळजी घेण्यात येत आहे. केसनंद तालुका हवेली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने पुणे-राहू रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत. या कोरोना मुक्तीसाठीच्या उपाययोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचे संशयित रुग्ण वाढत आहेत. त्यात पुण्यात या संशयितांची संख्या अधिक आहे. राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 52 झाली आहे, तर देशात १७०हून अधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत.