Remal cyclone Updates| ‘रेमल’ चक्रीवादळ अखेर रविवारी रात्री बांग्लादेश किनारपट्टीला धडकले. या काळात वाऱयाचा वेग ताशी तब्बल 120 ते 135 किमी इतका होता. तब्बल सहा तास या चक्रीवादळाने बांगलादेशात थैमान घातले. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
रेमाल चक्रीवादळ रविवारी रात्री उशिरा बांगलादेशातील मोंगलाच्या नैऋत्य भागातून भारताच्या पश्चिम बंगाल किनारपट्टीला ओलांडण्यास सुरुवात झाली. चक्रीवादळाचा प्रभाव कोलकाता, हावडा, हुगळी आणि पूर्व मेदिनीपूर, सुंदरबन आणि काकद्वीप जिल्ह्यात दिसून आला. येथे रविवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे.
सोमवारी त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोलकाता शहरातील अनेक भागात संततधार पाऊस सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. या वादळाच्या प्रभावाने पश्चिम बंगालमध्ये नुकसान होण्याची शक्यता असल्याने विविध यंत्रणा सतर्कतेचा उपाय म्हणून बचावकार्यासाठी सज्ज आहे. Remal cyclone Updates|
#WATCH पश्चिम बंगाल: कोलकाता शहर के कई हिस्सों में लगातार बारिश जारी है।
IMD के अनुसार, “चक्रवात रेमल कुछ और समय तक लगभग उत्तर की ओर और फिर उत्तर-उत्तर-पूर्व की ओर बढ़ता रहेगा और आज सुबह तक धीरे-धीरे कमज़ोर हो जाएगा।”#CycloneRemal pic.twitter.com/VAH1EzjUks
— ANI_HindiNews (@AHindinews) May 27, 2024
विमान उड्डाणे रद्द
या चक्रीवादळामुळे खबरदारी म्हणून बांगलादेशात समुद्रकिनारी राहणाऱ्या तब्बल आठ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बांगलादेशात 1 हजार 185 वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच बांगलादेशात अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली.
कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ रविवारी दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले. त्यामुळे 394 विमान उड्डाणे रद्द करण्यता आली. तर पूर्व आणि दक्षिण पूर्व रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण आणि उत्तर 24 परगणा तसेच पूर्व मेदिनीपूर जिह्यातून जाणाऱ्या काही गाडया रद्द केल्या आहेत. Remal cyclone Updates|
पहिले मान्सूनपूर्व चक्रीवादळ
दरम्यान, या वादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या चक्रीवादळाचा मान्सूनवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात या मोसमात निर्माण होणारे हे पहिले मान्सूनपूर्व चक्रीवादळ आहे. हे नाव ओमानने दिले असून रेमल हा अरबी शब्द आहे. याचा अर्थ वाळू असा आहे.
हेही वाचा: