पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कल्याणीनगर येथील अपघातानंतर येरवडा पोलीस ठाण्यातून अल्पवयीन आरोपी मुलाच्या कारचा चालक घरी जात असताना सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी त्याचे अपहरण केले. यासाठी त्यांनी बीएमडब्ल्यू या कारचा वापर केला. गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास हाती घेतल्यापासून ते गाडीचा शोध घेत आहेत.
मात्र, ही कार अजूनही बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. ही गाडी विशाल अग्रवाल यांच्या मित्राची असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातप्रकरणी सुरेंद्र आणि विशाल अग्रवाल या बाप बेट्यांवर एफआयआर दाखल झाला आहे. चालकाचे अपहरण
डांबून ठेवणे, दमदाटी करणे आणि पैशांचे आमिष दाखवून पुराव्यात छेडछाड करणे असे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले आहेत. याप्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यास शनिवारी अटक झाली. तर विशाल अग्रवाल यास न्यायालयलीन कोठडीतून या गुन्ह्यात वर्ग करुन घेण्यात येणार आहे. दरम्यान, अग्रवाल यांच्या चालकाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.