वाघोली, (प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे महानगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट 34 गावांच्या मूलभूत सोयी सुविधासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या समितीमध्ये वाघोलीचे माजी उपसरपंच शांताराम कटके यांची सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल दादांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची समन्वयक बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. अजित दादांची भेट ही कायम नवीन ऊर्जा आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून काम करण्याची प्रेरणा प्रदान करते. त्यांचे हे मार्गदर्शन कायम मिळत राहो, ही अशी भावना कटके यांनी व्यक्त केली.