पिंपरी, (प्रतिनिधी) – सोशल मीडियावर शेअर मार्केटची जाहिरात करून नागरिकाची 38 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 14 डिसेंबर 2023 ते २१ मार्च २०२४ पर्यंत पिंपळे सौदागर येथे घडला.
याप्रकरणी गुरुवारी (दि. 21) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून जीतू शर्मा, आर्यन खान, मुतू कुमार, डेव्हिन पेटीयार, सुझान बेलमी व महिला आरोपी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सोशल मीडियावर शेअर मार्केटची जाहिरात केली.
यामध्ये जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. एका व्हाट्सअप ग्रुपवर जॉईन केले. तेथे त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. मात्र फिर्यादी यांना कोणताही परतावा न देता 38 लाख 6 हजार 134 रुपयांची फसवणूक केली आहे. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.