वाघोली, (प्रतिनिधी); भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवारी यादीत पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांचा समावेश झाल्यानंतर प्रथमच पुण्यावरून अहिल्यानगरकडे (अहमदनगर) जाताना वाघोली आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल पंकजा मुंडे जंगी स्वागत केले.
वाघोली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला यावेळी पंकजा मुंडे यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. ढोल ताशांच्या गजरात तसेच जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करत नागरिकांनी केलेल्या स्वागताचा स्वीकार करत पंकजा मुंडे यांनी वाघोली आणि पंचक्रोशीतील नागरिकांचे सत्कार बद्दल आभार व्यक्त केले.