बंगलुरू – कर्नाटकातील काल झालेल्या तीन महापालिकांच्या निवडणुकांत प्रत्येकी एक महापालिका कॉंग्रेस व भाजपने जिंकली तर हुबळी-धारवाड महापालिकेत त्रिशंकु स्थिती निर्माण झाली आहे.
कलबुर्गीत कॉंग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तेथे कॉंग्रेसला 55 जागांपैकी 27 जागा मिळाल्या तर भाजपला 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे. जनता दल सेक्युलरला चार जागा मिळाल्या आहेत. हुबळी धारवाड मधील 82 जागांपैकी भाजपला 39 जागा कॉंग्रेसला 33 जागा मिळाल्या. जनता दल सेक्युलरला एक जागा मिळाली तर एमआयएम पक्षाला 3 जागा मिळाल्या. बेळगाव महापालिकेत भाजपने बहुमत मिळवल्याचे कालच स्पष्ट झाले आहे. मात्र हे निकाल भाजपच्या नवीन सरकारच्या बाजूने कौल देणारे आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री बोम्माई यांनी व्यक्त केली आहे.