Kangana Ranaut : बॉलीवूडमधील अनेक कलाकर मंडळी रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणासाठी उपस्थित राहिले होते. रजनीकांत, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, रोहित शेट्टी, रणदीप हुडा या कलाकारांचा समावेश आहे.यात अभिनेत्री कंगणा राणावतचा देखील समावेश होता. या सोहळ्याचे तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी तिने केलेला लुक विशेष चर्चेत आला आहे.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कंगनाने रेड-ऑरेंज कलरची काठ असेलली ऑफव्हाइट कलरची साडी नेसली होती. कंगनाने या साडीवर मॅचिंग ब्लाऊज कॅरी केला होता. यासोबत तिने या साडीवर रेड कलरची सुंदर ओढणी देखील घेतली होती. कंगना या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात अयोध्येतील मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होत असल्याने कंगना आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ती जय श्रीराम, जय श्रीराम अशा घोषणा देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
कंगनाने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये ‘राम आ गये’, असे लिहिले आहे. व्हिडीओवर सध्या लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे. कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कंगना अयोध्येमध्ये पोहचली तेव्हा तिने एका मंदिरातील स्वच्छतेचा व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना स्वच्छतेचे आवाहन केले होते.