Bollywood News । नुकताच सनी देओल आणि त्यांचा भाऊ बॉबी देओलसोबत ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये आले होते. या शो दरम्यान सनी आणि बॉबीने खुलासा केला की, त्यांचे वडील धर्मेंद्र यांनी कधीही त्यांच्यावर हात उचलला नाही परंतु त्यांची आई प्रकाश कौर यांनी मारून शिस्त लावली.’
सनी देओल आणि बॉबी देओल यांनी त्यांच्या बालपणीच्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहे. यादरम्यान दोन्ही भावांनीही सांगितले की, ‘त्यांची आई शिस्तीत राहण्यासाठी आम्हाला मारहाण करत असे. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की त्याचे वडील धर्मेंद्र यांनी कधी मारले का यावर ते म्हणाले,’वडिलांनी मला कधीच मारले नाहीत.’ लहानपणी आई आम्हाला शिस्त लावण्यासाठी मारत असे. सनी बाजी म्हणाले,’मला आईने खूप मारले आहे. ‘लहानपणी खेळताना जखमी झाल्यावरही मला पहिले मारले जायचे त्यांनतर जवळ घेतले जात असे. लहान असतांना मला जखमा झाल्या होत्या त्यावेळी आईने मला जवळ न घेता चप्पलने खूप मारले होते’
वर्कफ्रंट बाबत सांगायचं झाल्यास, सनी देओल शेवटचा थिएटरमध्ये रिलीज झालेला गदर 2 होता. याव्यतिरिक्त, सनी आमिर खान प्रॉडक्शन निर्मित राजकुमार संतोषीच्या लाहोर, 1947 मध्ये काम करणार आहे.
हे वाचले का ?