मुंबई – अभिनेत्री कंगना रानौतने मुंबई पोलीस व मुंबईबाबत केलेल्या बेताल वक्तव्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कंगनाने मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर असा केल्यानंतर शिवसेनेकडून तिला तिखट शब्दांमध्ये सुनावण्यात आलं होत. कंगना-शिवसेना वाद पेटला असतानाच मुंबई महापालिकेने कंगनाची कार्यालयाचा काही भाग अनाधिकृत असल्याचे सांगत त्यावर हातोडा चालवला होता. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली होती.
अशातच आज अभिनेत्री कंगना रानौत राज्यपालांची भेटत घेण्यासाठी राजभवनात पोहचली. राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीनंतर कंगनाने माध्यमांशी संवाद साधताना राज्यपालांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला.
Mumbai: Actor Kangana Ranaut and her sister Rangoli meet Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan https://t.co/43Fxd8cDol pic.twitter.com/48B3TTf6Cf
— ANI (@ANI) September 13, 2020
“मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना मला दिल्या गेलेल्या अन्यायपूर्वक वागणुकीबद्दल सांगितलं. माझी अशी आशा आहे की मला न्याय मिळेल. मला न्याय मिळाल्यास सामान्य नागरिक तसेच तरुणींचा व्यवस्थेवरील उडालेला विश्वास पुन्हा संपादित करण्यास मदत होईल. मी स्वतःला भाग्यवान समजते की राज्यपालांनी माझं मत स्वतःच्या मुलीसारखं समजून ऐकून घेतलं.”
#WATCH I met Governor Koshyari & told him about unjust treatment I’ve received. I hope justice will be given to me so that the faith of all citizens including young girls, is restored in the system. I am fortunate that the Governor listened to me like a daughter: Kangana Ranaut pic.twitter.com/aZRohVVUhi
— ANI (@ANI) September 13, 2020
दरम्यान, मुंबई महापालिकेने कंगनाची कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर संतापलेल्या कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर काल तिने आपल्या ट्विटर खात्यावर एक टीकात्मक फोटो शेअर करत त्यामध्ये मुख्यमंत्र्याना रावण दर्शवत खालची पातळी गाठली होती.
राज्यपालांशी झालेल्या भेटीदरम्यान कंगनासोबत तिची बहीण रांगोळी रानौत ही देखील उपस्थित होती.