मुंबई – अभिनेत्री कंगना रानौतने मुंबई पोलीस व मुंबईबाबत केलेल्या बेताल वक्तव्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कंगनाने मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर असा केल्यानंतर शिवसेनेकडून तिला तिखट शब्दांमध्ये सुनावण्यात आलं होत. कंगना-शिवसेना वाद पेटला असतानाच मुंबई महापालिकेने कंगनाची कार्यालयाचा काही भाग अनाधिकृत असल्याचे सांगत त्यावर हातोडा चालवला होता. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली होती.
अशातच आज अभिनेत्री कंगना रानौत राज्यपालांची भेटत घेण्यासाठी राजभवनात पोहचली आहे. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली याबाबतचा तपशील अद्याप समोर आला नसला तरी कंगना राज्यपालांसोबत चर्चा करतानाचे फोटो एका नामांकित वृत्तसंस्थेने पोस्ट केले आहेत.
दरम्यान, मुंबई महापालिकेने कंगनाची कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर संतापलेल्या कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर काल तिने आपल्या ट्विटर खात्यावर एक टीकात्मक फोटो शेअर करत त्यामध्ये मुख्यमंत्र्याना रावण दर्शवत खालची पातळी गाठली होती.
Mumbai: Actor Kangana Ranaut and her sister Rangoli meet Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan https://t.co/43Fxd8cDol pic.twitter.com/48B3TTf6Cf
— ANI (@ANI) September 13, 2020
दरम्यान, राज्यपालांशी झालेल्या भेटीदरम्यान कंगनासोबत तिची बहीण रांगोळी रानौत ही देखील उपस्थित होती.