न्यायव्यवस्था धोक्यात; सरन्यायाधीशांनी लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळले

नवी दिल्ली – न्यायालयातील एका माजी कर्मचारी महिलेने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. याप्रकरणी एका स्पेशल बेंचद्वारे सुनावणी करण्यात आली होती. मात्र रंजन गोगाई यांनी लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. न्यायव्यवस्था धोक्यात असून पुढील आठवड्यात अनेक महत्वपूर्ण प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. म्हणूनच जाणून-बुजून आरोप लावण्यात येत आहेत, असे रंजन गोगाई यांनी म्हंटले आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी म्हंटले कि, मुख्य न्यायाधीश म्हणून २० वर्षाच्या कार्यकाळाच्या प्रामाणिकपणाचे हेच बक्षीस मिळाले आहे का? २० वर्षांच्या सेवेनंतर माझ्या खात्यात केवळ ६ लाख ८० हजार रुपये आहेत. कोणीही माझे खाते तपासू शकतात. इतकेच नव्हेतर शिपायाकडेही माझ्यापेक्षा अधिक पैसे आहेत. ते पुढे  म्हणाले, न्यायव्यवस्थेला बळीचा बकरा बनविले जाऊ शकत नाही. काही व्यक्ती सीजेआयच्या ऑफिसला निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठीच अशाप्रकारचा आरोप लावण्यात आला आहे. महत्वपूर्ण प्रकरणांची सुनावणी निष्पक्ष करण्याचे आश्वासन मी जनतेला देतो, असे त्यांनी सांगितले. आधी ते जेलमध्ये होते आणि आता बाहेर आहेत. या पाठीमागे कोणा एकाचा हात नसून अनेक लोकांचा हात आहे.

रंजन गोगई पुढे म्हणाले कि, ज्या महिलेने आरोप लावला आहे. त्या महिलेने एका व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयात नोकरी देण्याच्या आमिषाने पैसे घेतले होते. यामुळे ती महिला चार दिवसांपासून जेलमध्ये होती.

काय आहे नेमके प्रकरण?

भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर न्यायालयातील एका माजी कर्मचारी महिलेनं शुक्रवारी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या महिलेनं आपलं म्हणणं २२ पानांच्या एका प्रतिज्ञापत्रावर मांडून सर्वोच्च न्यायालयाच्या २२ न्यायाधीशांसमोर मांडलंय. ही महिला कनिष्ठ न्यायालयात सहाय्यक म्हणून काम करत होती. महिलेनं केलेल्या आरोपानुसार, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात १० आणि ११ तारखेला राहत्या घरातल्या ऑफिसमध्ये तिचं लैंगिक शोषण केलं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.