पुणे – अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित १८ व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत दसॉल्ट सिस्टीम, सायबेज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीसीएमसी येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात अविरल सैनी (२३ धावा व २-२२) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दसॉल्ट सिस्टीम संघाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाचा ४ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाने २० षटकात ७ बाद १३१ धावा केल्या. यात साईनाथ शिंदे ५१, विक्रांत बांगर १५, तुषार आत्तर्डे १५, प्रवीण इंगळे ११ यांनी धावा केल्या.
दसॉल्ट सिस्टीमकडून भूषण पाटील (२-२५), अविरल सैनी (२-२२), सुयश मालवीया (१-६) यांनी सुरेख गोलंदाजी केली. हे आव्हान दसॉल्ट सिस्टीम संघाने १८.१ षटकात ६ बाद १३३ धावा करून पूर्ण केले. यात पीयूष सावंत २७ , संग्राम पाटील २३, अविरल सैनी २३, गौरव सिंग १८, भूषण पाटील १७ यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.
सामनावीर अविरल सैनी ठरला. दुसऱ्या सामन्यात शुभम खिंद्रे (नाबाद १३ व ३-१४) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सायबेज संघाने पबमॅटिक संघाचा ३४ धावांनी विजय मिळवत शानदार सुरुवात केली.