पुणे – अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित १८ व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत प्रशांत पोळच्या उपयुक्त ४६ धावांच्या खेळीच्या जोरावर एफआयएस ग्लोबल पुणे संघाने एसएस अँड सी अडव्हेंट संघाचा ६ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
पीसीएमसी येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रथम फलंदाजी करताना एसएस अँड सी अडव्हेंट संघाने २० षटकात ४ बाद १४९ धावा केल्या. यात हरीश केआर ३४, अकबरअली खान नाबाद ४९, मनीष सुपल नाबाद २०, राहुल कृष्णन १३, राजीव सिंग १३, अक्षय झारेकर १३ यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.
एफआयएस ग्लोबल संघाकडून सिद्धार्थ राणे (२-१७), ऋत्विक महाजन (१-३६) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात एफआयएस ग्लोबल पुणे संघाने हे आव्हान १९ षटकात ४ बाद १५२ धावा करून पूर्ण केले. यात प्रशांत पोळने ३२ चेंडूत ६ चौकार व १ षटकारासह ४६ धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला मृदुल म्हात्रेने ३० धावा, निशिथ गुप्तेने १६ धावा, गीत देसाईने नाबाद १५ धावा काढून साथ दिली. सामन्याचा मानकरी प्रशांत पोळ ठरला.