Mumbai Indians, Hardik Pandya Injury Update : नुकत्याच झालेल्या वर्ल्डकपमधील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या जखमी झाला होता. यानंतर हार्दिक पांड्या मैदानावर दिसला नाही. पण आता भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, हार्दिक पांड्या लवकरच मैदानात परतू शकतो.
हार्दिक पांड्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये हार्दिक पांड्या ट्रेनिंग करताना दिसत आहे. ज्यामध्ये तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. हा फोटो पाहून हार्दिकचे चाहते खूप खूश झाले आहेत. त्याला फिटनेस ट्रेनिंग करताना पाहून चाहत्यांच्या आनंदाला सीमाच उरली नाही. हार्दिकच्या या फोटोवरून असे समजते की, तो लवकरच पुनरागमन करू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.
Hardik Pandya has resumed his training. pic.twitter.com/DQ00laPBw1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 2, 2024
माहितीसाठी, नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता नाही. नुकताच मुंबई इंडियन्सचा कर्णधार झालेल्या हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये खेळेलच ही शक्यता कमी होती. पण, आता त्याच्या या फोटोने लोकांच्या मनात आशेचा किरण आणला आहे. जर पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त झाला तर तो आयपीएल खेळताना आणि मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषविताना दिसेल.
दरम्यान, त्याआधी हार्दिक पंड्या सध्या दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला कमबॅक करण्यासाठी वेळ लागण्याची तसेच तो आयपीएल 2024 स्पर्धेत मुकणार अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनण्याची शक्यता वर्तवली जात होती पण हार्दिक पांड्यानं पुनरागमन केलं तर तोच कर्णधारपद भूषवेल,
विश्वचषकादरम्यान दुखापत झाली होती हार्दिक पांड्याला…
सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळू शकला नाही. पण हार्दिक पांड्या भारत-अफगाणिस्तान मालिकेत पुनरागमन करू शकेल का? भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 11 जानेवारी रोजी उभय संघांमधील मालिकेतील पहिला टी-20 सामना होणार आहे. हार्दिक पांड्या मात्र भारत-अफगाणिस्तान मालिकेत खेळू शकणार नाही. मात्र, हार्दिक पांड्या लवकरच पुनरागमन करू शकतो, असे मानले जात आहे. अशाप्रकारे भारतीय चाहत्यांव्यतिरिक्त मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.
पांड्या पुन्हा दिसणार मुंबई इंडियन्सच्या जर्सीत…
अलीकडेच आयपीएल लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या संघाचा भाग बनवले होते. वास्तविक ट्रेंड विंडोमधून मुंबईने हार्दिक पंड्याला आपल्या संघात सामील करुन घेतलं. अशाप्रकारे IPL 2024 च्या मोसमात हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसणार आहे. इतकंच नाही, तर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला आपल्या संघाचा कर्णधारही बनवले आहे.
दरम्यान, हार्दिक पांड्या यापूर्वीही मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. हार्दिक पांड्या आयपीएल 2015 च्या मोसमात पहिल्यांदा खेळला होता. यानंतर हार्दिक पांड्या आयपीएल 2021 पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळत राहिला. यानंतर, आयपीएल 2022 पूर्वी, तो गुजरात टायटन्सचा भाग बनला.