पुणे – राज्य अश्वारोहण संघटना आणि नंदुरबार जिल्हा संघटनेच्या वतीने नंदुरबारमधील सारंगखेडा यात्रेतील चेतक फेस्टिव्हलमध्ये झालेल्या राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत पुण्याच्या ऐश्वर्या थैलने तीन सुवर्णपदकांची कमाई केली.
ऐश्वर्या थैल हीने १२ ते १४ वर्षे मुलींच्या गटात सहभागी होताना ड्रेसेज, हॅक्स, शो जपिंग नॉर्मल या प्रकारात अव्वल क्रमांक पटकावला. याचबरोबर तिने पोल बेंडिंगमध्ये ब्राँझपदकही मिळवले. ऐश्वर्या सेंट मेरीज स्कूलमध्ये आठवी इयत्तेत शिकते. ती पुण्यातील दिग्विजय हॉर्स रायडिंग क्लबमध्ये सराव करत आहे.
Chetak Festival – Sarangkheda 2023 : अश्वरोहणात आर्यची सुवर्ण कामगिरी
तिने गेल्या वर्षी सरावाला सुरवात केली. त्यामुळे तिच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे मोठे आव्हान होते. मात्र, मार्गदर्शक गुणेश पुरंदरे, प्रशिक्षक स्वप्नील साने, अनिकेत वाघोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने यश मिळवले.