Rajnath Singh | Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे. राजनाथ सिंह यांना तिसऱ्यांदा लखनौ लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी सपाने आमदार रविदास मेहरोत्रा यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
भाजपाचे दिग्गज अजातशत्रु नेते आणि तीन वेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा बालेकिल्ला म्हणजे लखनौ मानला जातो. त्यांनी सलग सहा वेळा याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. । Rajnath Singh | Lok Sabha Election 2024
बसपा आणि आम आदमी पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. भाजपकडून जुने दिग्गज राजनाथ सिंह यांना विजयाची हॅट्ट्रिक साधायची आहे, तर काँग्रेस समर्थित रविदास मेहरोत्रा यांच्यासमोर प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान असेल. दोन्ही उमेदवारांचे समर्थक सातत्याने जनसंपर्क करत आहेत.
गेल्या वेळी विक्रमी मतांनी विजयी झालेल्या राजनाथ सिंह यांच्यासमोर आपला विक्रम कायम ठेवण्याचे आव्हान असेल. २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तत्कालीन उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांचा २,७२,७४९ मतांनी पराभव केला होता. एवढेच नाही तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडला आणि सपाच्या पूनम सिन्हा यांचा ३,४७,३०२ मतांनी पराभव केला.
भारतरत्न आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हेही लखनौ मतदारसंघातून खासदार होते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सपा उमेदवार डॉ. मधु गुप्ता यांचा २,१८,३७५ मतांनी पराभव करून विक्रम केला. मात्र, २०१४ साली राजनाथ सिंह यांनी हा आकडा पार करत अटलबिहारी वाजपेयी यांचा विक्रम मोडीत काढला होता. । Rajnath Singh | Lok Sabha Election 2024
असे आहेत लखनौचे निकाल :
वर्ष, विजयी उमेदवार, (पराभूत उमेदवार)
१९९१ अटल बिहारी वाजपेयी (रणजित सिंह)
१९९६ अटल बिहारी वाजपेयी (राज बब्बर)
१९९८ अटल बिहारी वाजपेयी (मुझफ्फर अली)
१९९९ अटलबिहारी वाजपेयी (डॉ. करण सिंह)
२००४ अटल बिहारी वाजपेयी (डॉ. मधु गुप्ता)
२००९ लालजी टंडन (रिटा बहुगुणा जोशी)
२०१४ राजनाथ सिंह (रिटा बहुगुणा जोशी)
२०१९ राजनाथ सिंह (पूनम सिन्हा)