निवडणूक महाराष्ट्राची आहे की काश्मीरची?- जयंत पाटील

तासगाव: संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला,चिडलेला आहे आणि २१ ऑक्टोबरची वाट बघतोय. मोदी-शहा-फडणवीसांचे निष्क्रिय सरकार कधी गाडता येईल याची वाट बघणाराच महाराष्ट्र आज सर्वत्र दिसतोय, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

दुष्काळाने होरपळणाऱ्या जत या ठिकाणी अमित शहा यांची सभा झाली आणि भाषण केले – ३७० वर! दुष्काळाबद्दल एकतरी शब्द काढला का त्यांनी? निवडणूक महाराष्ट्राची आहे की काश्मीरची? महाराष्ट्रातल्या समस्यांचे काय? दुष्काळाचे काय? शेतकऱ्यांचे काय? लोकशाही आघाडीच्या काळात सिलेंडरची किंमत देखील रु. ३७०/- इतकीच होती तीच आता हजारापर नेऊन ठेवली त्याचे काय?, असे अनके प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले.

जयंत पाटील म्हणाले, आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रभर फिरायला सुरुवात केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कितीही फोडला तरी पवार साहेब जिथे जातील तिथे तरुण त्यांना प्रचंड प्रतिसाद देत आहेत. हे पाहून मोदी-शहा घाबरले. म्हणून त्यांनी साहेबांवर ईडीमार्फत खोटे घोटाळ्याचे आरोप लावले. परंतु पवार साहेब स्वतः ईडीकडे हजर होतो म्हटल्यावर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला. भाजपावाले खोटी-नाटी कामे करणारे लोक आहेत हे देशातील जनतेच्या आता लक्षात येऊ लागले असल्याचे पाटील म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)