जुन्नर (वार्ताहर) – जगातल्या सर्व महापुरुषांनी स्त्रियांच्या पोटी जन्म घेतला आहे याची जाणीव ठेवून स्रीशक्तीच्या कर्तुत्वाला समाजातील प्रत्येक घटकांनी कृतज्ञापूर्वक सलाम केला पाहिजे. महिलांच्या ताकदीच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक परिवर्तन घडवून आणत आहे.
महिलांना न्याय देण्यासाठी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची वाटचाल दमदारपणे सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांच्या बाबतीत अनेक उपयोगी निर्णय घेतलेत. घर यशस्वी महिलेमुळे होते, पक्ष मजबूत करायचा असेल तर पक्षातील प्रत्येक महिला खंबीरपणे उभी राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार अतुल बेनके यांनी केले.
जुन्नर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नूतन महिला पदाधिकार्यांना आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैष्णवी चतुर व पुणे जिल्हा निरीक्षक उज्वला शेवाळे, जुन्नर तालुका कार्याध्यक्ष ड. संगीता हांडे, अॅड. सलमा सय्यद, माजी नगरसेविका हाजरा ईनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जुन्नर शहर कार्यकारणी
उज्ज्वला शेवाळे (पुणे जिल्हा निरीक्षक), वैष्णवी चतुर (शहराध्यक्षा), कविता छाजेड (शहर कार्याध्यक्षा), अॅड. संगीता हांडे (जुन्नर तालुका कार्याध्यक्ष), हाजरा इनामदार (शहर उपाध्यक्ष), अफसाना इनामदार (सचिव), अल्फिया फकीर (सहसचिव), सईदा सय्यद सल्लागार, ज्योत्स्ना देशपांडे (सल्लागार).
प्रभाग अध्यक्ष व उपाध्यक्ष : माधुरी नांगरे, राजश्री शिवले, मीनल सूर्येकर, प्रतिमा परदेशी, बुशरा शेख, हिना आतार, पुष्पा फुलपगार, सना शेख, सुप्रिया खिलारी , तैहसन काजी , नफीसा इनामदार.
सदस्य : अश्विनी गवळी, निलोफर मुजावर, ज्योती गांधी, शुभांगी वाव्हळ, साबेरा इनामदार, संध्या नांगरे, सना इनामदार, तायरा शेख, शाहीन इनामदार, मोहलका काजी, आसिफा पठाण, सिंधू साळवे, रंजना वाघमारे, सुप्रिया खिल्लारी.