शरद पवारांना बघून भाजपचा अजगर गहिवरला -कोल्हे

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं प्रचार रण तापलं आहे. त्यामुळे राजकीय मंडळींच्या सभांनी राज्य ढवळून निघाले आहे. या सभांच्या माध्यमांतून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याचा काम सध्या जोरात सुरु आहे. “भाजपाच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस बांधवांना धावायला लावतात. त्यामुळे पोलिसांच्या मनात देखील विचार येत असतील की तुम्ही सत्तेतून खाली उतरा मग तुम्हाला देखील आमची खाकी वर्दी दाखवतो” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपाच्या महाजनादेश यात्रेवर टीका केली आहे.

कवठेमहांकाळ मध्ये आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कोल्हे बोलत होते. ते पुढे म्हणले की, भारतीय जनता पार्टी नावाचा एक भला मोठा अजगर सुटला होता. अजगर जो दिसेल त्याला सीबीआय, ईडीची भीती दाखवून फुत्कार टाकायचा.

त्यानंतर अनेकजण सीबीआय, ईडी चैकशीच्या भीतीने स्वत:चं अजगरच्या पोटात जाण्याचा निर्णय घेतला. तसेच राजीनामा घेऊन फिरणारा ढाण्या वाघ देखील अजगरच्या पोटात गेला असल्याचं सांगत शिवसेनेवर देखील यावेळी टोला लगवाला. तसेच काही दिवसांनंतर अजगरला एक वयस्कर व थकलेला व्यक्ती दिसला. अजगरने पुन्हा फुत्कार सोडत ईडीची भीती दाखवली. मात्र यानंतर अजरगचं गहिवरला कारण तो 79 वयाचा तरुण होता आणि त्याचं नाव शरद पवार होतं. अशा शब्दात कोल्हेनी शरद पवारांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर टीका केली आहे.

तसेच कोल्हे म्हणाले की, आर.आर.पाटील गृहमंत्री असताना पाच वर्षात ६५ हजारांची पोलीस भरती करत होते. भाजप सरकार ३० हजारांचीच करणार होते ती सुद्धा त्यांना करता आली नाही. उलट नोकर भरती ऐवजी भाजपचीच मेगा भरती सुरु आहे असा टोलाही कोल्हेनी लगावला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)