IPL 2024 ( RCBvsLSG Match 15, Virat Kohli ) : क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये विराट कोहलीच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. आता त्याने आयपीएल 2024 च्या 15 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. T20 क्रिकेटमध्ये एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 100 सामने खेळणारा कोहली आता पहिला भारतीय बनला आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमात आत्तापर्यंत आरसीबीने लखनौविरुद्ध पहिले 3 सामने खेळले आहेत आणि पहिला सामना वगळता उर्वरित 2 सामन्यांमध्ये कोहली चांगली कामगिरी करताना दिसला आहे.
अशी कामगिरी करणारा जागतिक क्रिकेटमधील 15 वा खेळाडू…
Virat Kohli ❤🔥 Namma Chinnaswamy
The first Indian cricketer to feature in 100 T20 matches at a single venue. 🔥#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #RCBvLSG pic.twitter.com/YeHnLFLi02
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 2, 2024
आतापर्यंत, टी-20 फॉरमॅटमध्ये असे फार कमी खेळाडू आहेत ज्यांनी एका मैदानावर 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत. अशी कामगिरी करणारा विराट कोहली जागतिक क्रिकेटमधील 15 वा खेळाडू ठरला आहे. तर तो भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये आतापर्यंत एकाच स्टेडियममध्ये 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळणारे सर्वाधिक खेळाडू हे बांगलादेशचे आहेत. ज्यामध्ये त्यांचे 11 खेळाडू आहेत आणि या सर्वांनी ढाक्याच्या मीरपूर स्टेडियममध्ये ही कामगिरी केली आहे.
IPL 2024 : आयपीएलच्या वेळापत्रकात अचानक झाला बदल, ‘या’ सामन्यांच्या बदलल्या तारखा; जाणून घ्या कारण….
याशिवाय इंग्लंड संघाचे ॲलेक्स हेल्स, समित पटेल आणि जेम्स विन्स या तीन खेळाडूचा या यादीत समावेश आहे. तर विराट कोहलीने बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ( M.Chinnaswamy Stadium ) 100 टी-20 सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे, जे त्याच्या आयपीएल संघाचे होम ग्राउंड देखील आहे.