IPL 2024 ( Live Cricket Score, KKR vs DC Toss & Playing Xi ) :- आयपीएल 2024 चा 47 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. या सामन्यास संध्याकाळी 7.30 वाजता कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरूवात होणार आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील KKR ने या मोसमात 8 सामने खेळले आहेत आणि 5 जिंकले आहेत. गेल्या सामन्यात त्याने दिल्लीचा पराभव केला होता. ऋषभ पंतचा संघ केकेआरच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. या सामन्यातही त्याला कडवे आव्हान उभे राहू शकते.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल ( Toss update ) हा दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बाजूनं लागला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरतील. या सामन्यात दिल्लीचा संघ दोन बदलांसह दाखल झाला आहे. पृथ्वी शॉचे पुनरागमन झाले असून, कुमार कुशाग्राच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुकेश कुमारच्या जागी रसिक दार सलामला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मिचेल स्टार्क आणि वैभव अरोडं यांचे कोलकाता संघात पुनरागमन झाले आहे.
🚨 Toss Update 🚨
Delhi Capitals win the toss and elect to bat against Kolkata Knight Riders.
Follow the Match ▶️ https://t.co/eTZRkma6UM#TATAIPL | #KKRvDC pic.twitter.com/TdUxJxzKqV
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2024
KKR vs DC : दोन्ही संघांची Playing 11 खालीलप्रमाणे…
कोलकाता नाइट रायडर्स : फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती. ( इम्पॅक्ट सब : आंगकृष्ण रघुवंशी, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज)
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद. (इम्पॅक्ट सब : मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रिकी भुई, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा)
दरम्यान, कोलकाता पाच विजय आणि आठ पैकी तीन पराभवानंतर 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर दिल्ली 10 पैकी पाच विजय आणि तितक्याच पराभवानंतर 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. आयपीएलच्या इतिहासात कोलकाता विरुद्ध दिल्ली यांच्यात एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. यापैकी केकेआरने 17 सामने जिंकले असून दिल्लीने 15 सामने जिंकले आहेत.