पॅरिस : रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता संपूर्ण जगावर उमटत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आतापर्यंत दोन भारतीय विद्यार्थ्यांना या युद्धात आपला जीव गमावावा लागला आहे. तर, आणखी एक विद्यार्थी युक्रेनची राजधानी किव्हमध्ये गोळीबारात जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयीची माहिती केंद्रीय मंत्री व्हीके सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
रशिया-युक्रेन दरम्यानच्या युद्धातून आतापर्यंत हजारो विद्यार्थांना मायदेशी परत आणण्यात आले आहे. मात्र अजूनही हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनची राजधानी किव्हसह दुसऱ्या शहरांमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार ऑपरेशन गंगा राबवत आहे.
I received info today that a student coming from Kyiv got shot and was taken back midway. We’re trying for maximum evacuation in minimum loss: MoS Civil Aviation Gen (Retd) VK Singh, in Poland#RussiaUkraine pic.twitter.com/cggVEsqfEj
— ANI (@ANI) March 4, 2022
दरम्यान, युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याच्या कामावर देखरेख करण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये विशेष दूत म्हणून पाठवण्यात आलेल्या चार मंत्र्यांपैकी जनरल सिंग हे एक आहेत. त्यांनी या विद्यार्थ्यावर गोळी झाडली गेल्याची माहिती दिली.
युक्रेनची राजधानी कीवमध्ये एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री व्हीके सिंग यांनी दिली. हा विद्यार्थी किव्हमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर गोळी झाडली गेली. यानंतर त्यांला पुन्हा शहरात नेण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले.