नवी दिल्ली – ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी आज देशाचे २८ वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ते ऍडमिरल आर हरी कुमार यांच्यानंतर नौदल प्रमुख झाले आहेत. सागरी क्षेत्रातील उदयोन्मुख आव्हाने लक्षात घेता संभाव्य शत्रूंना रोखण्यासाठी नौदलाने सदैव कार्यरत राहावे, अशी अपेक्षा त्यांनी आज व्यक्त केली. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करून आणि राष्ट्रीय विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनून आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारतीय नौदलाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देतील यावरही त्यांनी भर दिला. ऍडमिरल त्रिपाठी यांनी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम केले आहे.
कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर तज्ज्ञ, त्यांनी नौदलाच्या फ्रंटलाइन युद्धनौकांवर सिग्नल कम्युनिकेशन ऑफिसर आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर ऑफिसर आणि नंतर गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आयएनएस मुंबईचे कार्यकारी अधिकारी आणि प्रधान युद्ध अधिकारी म्हणून काम केले आहे.
त्यांनी विनाश, किर्च आणि त्रिशूल या भारतीय नौदलाच्या जहाजांचे नेतृत्व केले आहे. ऍडमिरल त्रिपाठी यांना कर्तव्यनिष्ठेसाठी अति विशिष्ट सेवा पदक आणि नौसेना पदकाने गौरवण्यात आले आहे.