India Announce T20I, ODI Squad Against Australia : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND-W Vs AUS-W) तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोष आणि वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर यांचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. वानखेडे स्टेडियमवर 28 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान एकदिवसीय सामने खेळवले जातील, तर टी-20 सामने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 5 ते 9 जानेवारी दरम्यान खेळवले जातील.
या जुलैमध्ये बांगलादेशविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी रिचा घोषची निवड करण्यात आली नव्हती. आता पाच महिन्यांनंतर ती एकदिवसीय संघात परतली आहे. वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटीत ऋचाला तिच्या चमकदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर आणि तीतस साधू आणि डावखुरी फिरकीपटू सायका इशाक यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या टी-20मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयंका पाटील हीचा देखील प्रथमच एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. बांगलादेशविरुद्ध शेवटची एकदिवसीय मालिका खेळलेल्या आणि सध्याच्या संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंमध्ये मेघना सिंग, देविका वैद्य आणि प्रिया पुनिया यांचाही संघात समावेश आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मागील मालिकेतील टी-20 आंतरराष्ट्रीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, ज्यामध्ये भारतीय महिला संघाला 2-1 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. हरमनप्रीत कौर आणि कंपनीने कसोटी सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया सध्या वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वविजेते आहे आणि त्यांना घरच्या भूमीवरही पराभूत करणे सोपे जाणार नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ-
एकदिवसीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा आणि हरलीन देओल.
T20 संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग.ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्रकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी.