Team India in 2023 : टीम इंडियाचा 2023 मध्ये फक्त एक सामना बाकी आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्याआधी जाणून घ्या, भारतासाठी यावर्षी सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोण आहेत..
रवींद्र जडेजाने 2023 मध्ये टीम इंडियासाठी आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाने यावर्षी टीम इंडियासाठी 35 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 66 विकेट घेतल्या आहेत. या काळात त्याची गोलंदाजीची सरासरी 23 आणि स्ट्राईक रेट 42 राहिला आहे.
या वर्षी कुलदीप यादव भारतासाठी दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 39 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 63 बळी घेतले. त्याने 18.85 च्या गोलंदाजीची सरासरी आणि 23.6 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजी केली.
मोहम्मद सिराज येथे तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिराजने यावर्षी 33 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 58 विकेट घेतल्या. या काळात सिराजची गोलंदाजीची सरासरी 23 आणि स्ट्राईक रेट 31 इतका राहिला आहे.
या प्रकरणात मोहम्मद शमी चौथ्या स्थानावर आहे. 2023 मध्ये शमीने टीम इंडियासाठी एकूण 23 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने 20 च्या सरासरीने आणि 26 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजी करताना 47 विकेट घेतल्या आहेत.
यावर्षी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांच्या टॉप-5 यादीत शेवटचे स्थान आर अश्विनचे आहे. या वर्षी अश्विनने 17.31 च्या सरासरीने आणि 37.8 च्या स्ट्राइक रेटने गोलंदाजी करताना 45 बळी घेतले. विशेष म्हणजे अश्विनने केवळ 9 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इतक्या विकेट घेतल्या.