Team India In 2023 : मंगळवारपासून (26 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणारा कसोटी सामना टीम इंडियासाठी या वर्षातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. टीम इंडियाचा हा 2023 सालातील 66 वा सामना असेल. यापूर्वीच्या 65 सामन्यांमध्ये भारतीय संघाने 45 सामने जिंकले आहेत. भारताला केवळ 16 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या कालावधीत दोन सामने ड्रा तर दोन सामने रद्द झाले आहेत.
Test Match Record :
सर्व प्रथम कसोटी रेकॉर्डबद्दल पाहूया. टीम इंडियाने यावर्षी फक्त 7 कसोटी सामने खेळले. त्याने पाच सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा आणि दोन सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा सामना केला. या 7 पैकी 3 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला होता. त्याचवेळी त्यांना 2 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. या काळात 2 सामने अनिर्णित राहिले. म्हणजेच 2023 मध्ये टीम इंडियाचा कसोटी रेकॉर्ड सरासरी राहिला.
ODI Match Record :
टीम इंडियाने यावर्षी एकूण 35 एकदिवसीय सामने खेळले. येथे 27 सामने जिंकले आणि केवळ 7 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या कालावधीत एक सामनाही अनिर्णित राहिला. म्हणजे जवळपास प्रत्येक पाच सामन्यांमध्ये टीम इंडियाने चार सामने जिंकले आणि एक सामना हरला.
T20 Match Record :
भारतीय संघाने यावर्षी 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने 15 जिंकले आणि 7 हरले. एक सामना अनिर्णित राहिला. एकूणच, भारतीय संघाने प्रत्येक तीनपैकी दोन सामने जिंकले आणि एक सामना गमावला.
दोन आयसीसी फायनलही खेळले…
टीम इंडियाने यावर्षी दोन आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये भाग घेतला होता. सर्वप्रथम जूनमध्ये भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळली आणि नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय वर्ल्ड कपची फायनलही गाठली. मात्र या दोन्ही अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अशाप्रकारे 2013 नंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न गेल्या 9 वर्षांप्रमाणे यंदाही केवळ स्वप्नच राहिले.