India vs South Africa 2nd Test, Pitch Report, Playing 11 & Live Streaming : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. केपटाऊनमध्ये उभय संघांमधील सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. सध्या भारतीय संघ 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला होता. मात्र, मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने भारतीय संघ केपटाऊनमध्ये दाखल होणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मालिका जिंकायची आहे.
केपटाऊनची खेळपट्टी कशी असेल?
केपटाऊनची खेळपट्टी वेगवान गती आणि उसळीसाठी ओळखली जाते. त्याचवेळी या खेळपट्टीचे काही फोटो समोर आले आहेत. खेळपट्टीवर गवत राखले गेल्याचे या चित्रात स्पष्ट दिसत आहे. म्हणजेच वेगवान गोलंदाजांना मदत होईल. त्याचबरोबर फलंदाजांचे आव्हानही वाढणार आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करू शकतो, असे मानले जाते. सुरुवातीच्या षटकांमध्ये नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरेल. मात्र, जसजसा सामना पुढे जाईल तसतशी फलंदाजी सोपी होत जाईल, पण खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगली साथ देऊ शकते.
Zimbabwe Tour of Sri Lanka 2024 : श्रीलंका दौऱ्यासाठी झिम्बाब्वेचा ODI आणि T20 संघ जाहीर…
लाइव्ह कधी, कसे आणि कुठे पाहता येईल?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊन कसोटीला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. भारतीय चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. त्याच वेळी, क्रिकेट चाहत्यांना डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेता येणार आहे. पण डिस्ने प्लस हॉटस्टारवर सामना पाहण्यासाठी चाहत्यांना सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल, म्हणजेच त्यांना पैसे द्यावे लागतील.
भारताचं संभाव्य प्लेइंग 11 –
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिकेचं संभाव्य प्लेइंग 11 –
टोनी डी झॉर्झी, डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, विआन मुल्डर, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, जेराल्ड कोएत्झी, नांद्रे बर्जर.