Zimbabwe Cricket (ODI & T20) Team Squad For Sri Lanka Tour : झिम्बाब्वे संघ श्रीलंका दौऱ्यावर वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी झिम्बाब्वेचा 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. क्रेग एर्विन वनडे फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करेल. त्याचबरोबर सिकंदर रझा टी-20 फॉरमॅटमध्ये झिम्बाब्वेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. गेल्या वर्षी आयर्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत क्रेग इर्विन दुखापतीचा बळी ठरला होता. यानंतर क्रेग इर्विन मैदानापासून दूर होता, पण आता जवळपास 12 महिन्यांनंतर क्रेग इर्विन पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
झिम्बाब्वे आणि श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक…
झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 6 जानेवारीला खेळवला जाणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा वनडे 8 जानेवारीला खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे 11 जानेवारीला खेळवला जाणार आहे. यानंतर टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. 14 जानेवारीपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तर टी-20 मालिकेतील शेवटचा सामना 18 जानेवारीला होणार आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यातील सर्व सामने कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
Zimbabwe announce ODI, T20I squads for Sri Lanka tour 🔽#SLvZIM pic.twitter.com/HcPQaq91BU
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) January 1, 2024
एकदिवसीय मालिकेसाठी झिम्बाब्वे संघ-
क्रेग एर्विन (कर्णधार), फ़राज़ अकरान, रयान बर्ल, जॉयलॉर्ड गम्बी, ल्यूक जोंगवे, ताकुदज़्वानाशे कैटानो, तिनशे कामुनहुकामवे, क्लाइव मदांडे, वेलिंगटन मसाकाद्ज़ा, तापीवा मुफुद्ज़ा, टोनी मुनयोंगा, ब्लेसिंग मुज़ारबानी, रिचर्ड नगारवा, सिकंदर रज़ा और मिल्टन शुम्बा.
T20 मालिकेसाठी झिम्बाब्वे संघ-
सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रयान बर्ल, क्रेग एर्विन, जॉयलॉर्ड गम्बी, ल्यूक जोंगवे, तिनशे कामुनहुकामवे, क्लाइव मदांडे, वेलिंगटन मसाकाद्जा, कार्ल मुंबा, टोनी मुनयोंगा, ब्लेसिंग मुजाराबानी, आइंस्ले एनडलोवु, रिचर्ड नगारवा और मिल्टन शुंबा