T20 World Cup 2024 ( Team India & Irfan Pathan ) : आयपीएल 2024 नंतर अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी संघ निवडण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे. जूनमध्ये होणाऱ्या या जागतिक स्पर्धेसाठी सर्व संघांनी 1 मे पूर्वी त्यांच्या खेळाडूंची नावे जाहीर करणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसांत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करेल, असे मानले जात आहे.
यापूर्वी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने या स्पर्धेसाठी आपला संघ निवडला आहे ज्यामध्ये त्याने संजू सॅमसन आणि केएल राहुल सारख्या वरिष्ठ खेळाडूंचा समावेश केलेला नाही.
संघात सहभागी होण्यासाठी आहेत अनेक दावेदार…
संयोजनाचा विचार करून योग्य संघ निवडणे ही निवडकर्त्यांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी आहे. आयपीएल 2024 मध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी करत आहेत. संघात स्थान मिळवण्यासाठी आधीच अनेक दावेदार होते, मात्र युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे निवड समितीसमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या खेळाडूंचा खराब फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय आहे, जे या मोसमात आतापर्यंत छाप पाडू शकले नाही.
यशस्वी-रिंकूला संधी, श्रेयसला स्थान नाही…
इरफान पठाणने T20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड केली आहे ज्यात त्याने यशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंग यांचा समावेश केला आहे, परंतु श्रेयस अय्यरसाठी दरवाजे बंद ठेवले आहेत. इरफानने कर्णधार रोहित शर्मासह यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांचा टॉप ऑर्डरसाठी समावेश केला आहे, तर शुभमन गिलचा राखीव म्हणून समावेश केला आहे.
त्याचबरोबर मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, ऋषभ पंत आणि शिवम दुबे यांचा त्यांच्या संघात समावेश करण्यात आला आहे, तर हार्दिक पांड्याला एकमेव गोलंदाजी अष्टपैलू म्हणून ठेवण्यात आले आहे. शिवम दुबे सुद्धा गोलंदाजीत सक्षम आहे, पण चेन्नई सुपर किंग्सने (CSK) त्याला अजून IPL मध्ये गोलंदाजी दिलेली नाही.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इरफानने संजू सॅमसन आणि केएल राहुलसारख्या यष्टीरक्षक फलंदाजांना संघात ठेवले नाही आणि यष्टिरक्षक म्हणून फक्त पंतलाच ठेवले आहे. याशिवाय इरफानने कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरलाही स्थान दिलेले नाही.
My squad for the World Cup.
1) Rohit Sharma (C)
2) Yashasvi Jaiswal
3) Virat Kohli
4) Surya Kumar Yadav
5) Rishabh pant (wk)
6)Shivam Dube
7) Hardik Pandya provided he is bowling regularly
8)Rinku singh
9)Ravindra jadeja
10) Kuldeep Yadav
11)Jasprit Bumrah
12)Arshdeep…— Irfan Pathan (@IrfanPathan) April 24, 2024
सिराजवर विश्वास, मयंकला मिळाली नाही जागा…
इरफान पठाणने रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना फिरकीपटू म्हणून ठेवले आहे, तर रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्तीसारख्या गोलंदाजांचा त्याच्या यादीत समावेश नाही. वेगवान गोलंदाजी विभागात इरफानने जसप्रीत बुमराहसह मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश केला आहे, परंतु टी. नटराजन, मयंक यादव आणि खलील अहमद या गोलंदाजांना बाहेर ठेवले आहे.
Sachin Tendulkar 51th Birthday : ‘सचिन’ अन् ’24’ तारीख…! जाणून घ्या…नेमकं काय आहे खास कनेक्शन..?
टी20 विश्वचषकासाठी इरफानने निवडलेला 15 सदस्यीय भारतीय संघ पुढीलप्रमाणे :- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.