South Africa Vs India 3rd ODI Toss Update :- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (21 डिसेंबर) खेळवला जात आहे. पार्ल येथील बोलंड पार्क येथे दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांनी या मालिकेत प्रत्येकी 1 सामना जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता हा तिसरा सामना जिंकताना मालिकाही जिंकण्यासाठी दोन्ही संघ सज्ज बनले आहेत.
भारत विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टाॅस जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय संघाला सलग दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. गेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
🪙 TOSS
🇿🇦 The Proteas have won the toss and elected to bowl first
#WozaNawe #BePartOfIt #SAvIND pic.twitter.com/KE5tvPzrl7
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 21, 2023
ऋतुराज गायकवाड हा जखमी झाला आहे. त्याच्या जागी रजत पाटीदारने भारतासाठी पदार्पण केले. दरम्यान, कुलदीप यादवला विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
IND-W vs AUS-W One-Off Test Day 1 | भारताची भेदक गोलंदाजी; ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 219 वर आटोपला…
या सामन्यातून रजत पाटीदार यानं भारतीय संघाकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. नाणेफेकीपूर्वी त्याला पदार्पणाची कॅप देण्यात आली आहे. मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा रजत पाटीदार हा आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचा सदस्य आहे.