South Africa Vs India 3rd ODI Live score :- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (21 डिसेंबर) खेळवला जात आहे. पार्ल येथील बोलंड पार्क येथे दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांनी या मालिकेत प्रत्येकी 1 सामना जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता हा तिसरा सामना जिंकताना मालिकाही जिंकण्यासाठी दोन्ही संघ सज्ज बनले आहेत.
भारत विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टाॅस जिंकला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने 44 षटकात 4 विकेट गमावत 235 धावा केल्या आहेत.
𝐌𝐀𝐈𝐃𝐄𝐍 𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃
The wait is over! @IamSanjuSamson scores his first century for India and it has come off 110 balls in the decider at Paarl. 👏🏾👏🏾 https://t.co/nSIIL6gzER #TeamIndia #SAvIND pic.twitter.com/DmOcsNiBwC
— BCCI (@BCCI) December 21, 2023
दरम्यान, संजू सॅमसनने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले आहे. त्याने 44व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत आपले शतक पूर्ण केले. त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिले शतक आहे. सॅमसनने जबाबदारीने खेळताना 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने पहिले वनडे शतक झळकावले.
संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला. संजूने 110 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. 29 वर्षीय संजूचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिले शतक आहे. विशेष म्हणजे संजूने पदार्पणाच्या 8 वर्षानंतर पहिले शतक झळकावले आहे. संजूने 2015 मध्ये T20I क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. 2021 मध्ये त्याने टीम इंडियासाठी पहिला एकदिवसीय सामना खेळला होता.
AUS-W Vs IND-W 1st Test Day 1 Stumps : पहिल्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे Team India चे वर्चस्व…
दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना शतक झळकावणारा संजू हा तिसरा भारतीय आहे. त्याच्या आधी सौरव गांगुली आणि विराट कोहली यांनी हा पराक्रम केला होता.