IPL 2024 (SRH vs RCB Match 41) : आयपीएल 2024 चा 41 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज( 24 एप्रिल,गुरुवार) होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार फाफ डु प्लेसिस याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात आरसीबीने कोणताही बदल न करता प्रवेश केला आहे तर हैदराबादच्या प्लेइंग 11 मध्ये एक बदल करण्यात आला आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी जयदेव उनाडकटचा प्रवेश झाला आहे.
🚨 Toss Update 🚨
Royal Challengers Bengaluru elect to bat against Sunrisers Hyderabad.
Follow the Match ▶️ https://t.co/2EpEyR3hPu#TATAIPL | #SRHvRCB pic.twitter.com/BuJqnYO4Ic
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2024
SRH vs RCB : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, विल जॅक, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल.
इम्पॅक्ट सब: सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, हिमांशू शर्मा, विजयकुमार वैश, स्वप्नील सिंग.
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टी नटराजन.
इम्पॅक्ट सब : उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, ट्रॅव्हिस हेड.
सनरायझर्स हैदराबादने यंदाच्या हंगामात आपल्या फलंदाजांच्या जोरावर मारक कामगिरी केली आहे. पॅट कमिन्सच्या संघाने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत, तर 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आले आहेत. दुसरीकडे आरसीबीची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 8 सामन्यांपैकी फक्त 1 विजय नोंदवला आहे, तर उर्वरित सर्व सामने गमावले आहेत. फॅफच्या नेतृत्वाखालील संघ 2 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे.
World Record : ‘या’ क्रिकेटपटूने केला विश्वविक्रम, एकही धाव खर्च ‘न’ करता घेतल्या 7 विकेट…
दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 24 वेळा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, एसआरएचने 13 सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने 10 सामने जिंकले आहेत. SRH ने RCB विरुद्ध सर्वाधिक 287 धावा केल्या आहेत. तर, आरसीबीने एसआरएचविरुद्ध सर्वाधिक 262 धावा केल्या आहेत.