India Women vs Australia Women One-Off Test Day 1 | ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना भारतीय महिला क्रिकेट संघासोबत एक कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 T20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिली मालिका, म्हणजेच एकमेव कसोटी सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाने नुकताच इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवला होता. आता ऑस्ट्रेलियालाही हरवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. या सामन्यातून ऋचा घोषने भारतासाठी पदार्पण केले आहे.
या एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीली हीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र तिचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाला पहिला डाव 77.4 षटकात 219 धावांवरच आटोपला. भारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमधील पहिल्या डावातील ऑस्ट्रेलियाची ही सर्वात लहान धावसंख्या आहे.
A brilliant bowling display from #TeamIndia! 🙌 🙌
Australia all out for 219.
4⃣ wickets for @Vastrakarp25
3⃣ wickets for @SnehRana15
2⃣ wickets for @Deepti_Sharma06Scorecard ▶️ https://t.co/8qTsM8XSpd #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/WVtphNFV2c
— BCCI Women (@BCCIWomen) December 21, 2023
ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीत ताहिला मॅकग्राने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. याव्यतिरिक्त कर्णधार अॅलिसा हिलीने 75 चेंडूत 38 धावाची तर बेथ मुनी हिने 94 चेंडूत 40 धावांची खेळी केली. किम गर्थ 28 धावा करून नाबाद परतली.
भारताकडून गोलंदाजीत पूजा वस्त्राकरने 16 षटके टाकत 53 धावा देताना सर्वाधिक चार विकेट घेतल्या तर स्नेह राणा हिने 22.4 षटकात 56 धावा देत तीन बळी घेतले. दीप्ती शर्मा हिने 19 षटकात 45 धावा खर्च करताना 2 बळी घेतले. तर आॅस्ट्रेलियाची एक फलंदाज धावबाद झाली.