IND vs PAK – टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरु झाल्यापासून सर्वच क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान ( IND vs PAK ) सामन्याची उत्सुकता लागली होती. आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील मैदानावर या दोन्ही संघामध्ये सामना खेळला जात आहे. सामन्याच्या सुरुवातीला भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी सुरुवातीला गोलंदाजांना चांगली साथ देईल अशी शक्यता आहे. त्यामुळेच कर्णधार रोहितने अगोदर गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
नाणेफेकीनंतर दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने सामन्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी भारताचे राष्ट्रगीत संपल्यानंतर रोहित शर्मा भावुक झाल्याचा दिसला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना भारतीय वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना जखडून ठेवले यश मिळवले.
#T20WorldCup | पाकिस्तान विरुद्ध कॅप्टन रोहित शर्माची कामगिरी खूपच खराब
#NationalAnthem 🇮🇳#T20WorldCup #T20WC2022 #INDvPAK #INDvsPAK #INDvsPAK2022 #RohitSharma #RohitSharma𓃵 #ViratKohli𓃵 pic.twitter.com/RUjn8O4oz3
— Journalist_Rakshit Yadav (@RakshitYadav25) October 23, 2022
बातमी लिहिली त्यावेळेपर्यंत पाकिस्तान संघ ५ षटकांत २ गडी गमावून २४ धावांवर आहे. पाकने त्यांचे दोन प्रमुख फलंदाज मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांना स्वस्तात गमावले आहे. भारताने ठरवलेल्या रणनीतीप्रमाणे अर्शदीप सिंगने आगोदर बाबरला शून्यावर आणि त्यानंतर रिझवानला ४ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला.
In the air & taken in the deep by @BhuviOfficial! 👏 👏@arshdeepsinghh scalps his 2⃣nd wicket as he dismisses Mohammad Rizwan. 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/mc9useyHwY #TeamIndia | #T20WorldCup | #INDvPAK pic.twitter.com/fr7MKHFUTE
— BCCI (@BCCI) October 23, 2022
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.
पाकिस्तान संघ – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शान मसूद, मोहम्मद नवाज, आसिफ अली, शादाब खान, हैदर अली, इफ्तिखार अहमद, हरिस रौफ, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.