मुंबई – अभिनेता अभिषेक बच्चन हा शांत स्वभावाचा व्यक्ती म्हणून इंडस्ट्रीमध्ये ओळखला जातो. परंतु ट्रोलर्स विरोधात ट्विटरवर त्याने एका युजरला उत्तर देत आपला आक्रमकपणा दाखवून दिला आहे. अभिषेक बच्चनने ट्विटरवर एका ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले आहे.
एका युजरने अभिषेकची खिल्ली उडवत त्याला ‘बेरोजगार’ म्हंटल तसेच याचा संबद्ध त्या युजरने बुद्धीशी देखील लावला. यानंतर अभिषेकने त्याला अफलातून उत्तर दिल्याचं ट्विटरवर पाहायला मिळत. तर झालं असं,एका ट्वीटला उत्तर देताना अभिषेकने प्रश्न विचारला की “लोक अजूनही वृत्तपत्र वाचतात का?” यावर एका यूझरने अभिषेकला टॅग करत उत्तर दिलं की “हुशार, बुद्धिमान लोक वाचतात, तुझ्यासारखे बेरोजगार नाही.”
यावर अभिषेकने त्या युजरला रिप्लाय दिला,अभिषेकने गमतीत त्या युजरचे आभार मानले. त्याने ट्विटमध्ये लिहिले, ‘इनपुटबद्दल धन्यवाद, बुद्धिमत्ता आणि नोकरीचा काही संबंध नाही. तुमचेच उदाहरण घ्या. मला खात्री आहे की तुम्ही कमावते (एम्प्लॉइड) आहात, पण मला खात्री आहे (ट्विट पाहून) तुम्ही हुशार नाहीत.
Intelligent people do. Not unemployed people like you🤣
— CJain (@CJain3018) October 22, 2022
अभिषेकने दिलेल्या या उत्तरामुळे या युजरची बोलती तर बंद झालीच शिवाय अभिषेकच्या सेंसॉफ ह्यूमरचा देखील सर्वांना प्रत्येय आला. अभिनेत्याने ट्रोलर्सला उत्तर देण्याची ही पहिलीच वेळ नाही. अभिषेकने दिलेल्या या उत्तरावर अनेकांनी अभिषेकची बाजू घेत ट्विट्सचा पाऊस पाडला आहे.