Lok Sabha Elections 2024 । 21 राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 102 जागांसाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुरू असलेल्या मतदानात 2 तासांचा टप्पा गाठला आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.
हा व्हिडिओ मोदींच्या यवतमाळ येथील प्रचार सभेतील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात यवतमाळच्या भारी येथे सभा घेतली. या सभेत दोन लाखाहून अधिक महिला सहभागी झाल्या. या सभेची जय्यत तयारी सूरू असताना एकच गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे फोटो झळकल्याची घटना घडली. दरम्यानचा विडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या संबंधित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नुकतीच या भागात काँग्रेसची बैठक झाली. त्यामुळे त्या कार्यक्रमाच्या खुर्च्यांवर राहुल गांधी यांची छायाचित्रे लावण्यात आली होती, मात्र त्या खुर्च्या ज्या ठेकेदाराने काँग्रेसच्या बैठकीत पुरविल्या होत्या, त्याच खुर्च्या भाजपच्या कार्यक्रमाला पाठवल्या. त्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला असून हा व्हिडिओ व्हायरल होऊन खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे बुधवारी यवतमाळ शहरालगतच्या अनेक रस्त्यांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे.
हे वाचले का ?
21 राज्यांमध्ये 9 वाजेपर्यंत किती मतदान झाले?
पश्चिम बंगालमधील मतदान केंद्रात CRPF जवानाचा सापडला ‘मृतदेह’