नगर -करोना महामारीत दुग्धव्यवसाय संकटात सापडला असून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे दुधाला प्रतिलीटर 35 रुपये भाव व पाच रुपये अनुदान मिळावे, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या दक्षिण महिला जिल्हाध्यक्षा मंदाकीनी बडेकर यांनी केली.
या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने नगर तहसिल कार्यालयासमोर रासपाच्या महिला जिल्हाध्यक्षा बडेकर यांच्या नेतृत्वाखाली पांडूरंगाच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून दुध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष चिमाजी खामकर, महिला तालुकाध्यक्ष राणी बुगे, युवा शहराध्यक्ष निलेश ढवण यांसह रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तहसिलदार उमेश पाटील यांना निवेदन यांना देण्यात आले. गेल्या महिन्यात दुध दरवाढीसाठी निवेदन देण्यात आले होते मात्र, त्यात सुधारणा दिसून न आल्याने दुधाला 35 रु भाव व अनुदान 5 रुपये मिळावे, राज्यशासनाला सदबुद्धी द्यावी यासाठी पांडूरंगाला दुग्धाभिषेक घालण्यात आला.