सीसीटीव्हीवरील माहितीचे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा विश्लेषण
मुंबई – लॉकडाऊन अंशतः शिथिल केल्यानंतर गृहमंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंपन्यांतील कामकाज सुरू झाले आहे. त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती उपकरणे आणि यंत्रणा काही कंपन्या विकसित करीत आहेत.
भारत फोर्ज या कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हेल्थ मॉनिटरिंग सिस्टिम विकसित केली आहे. याकरिता या कंपनीने ब्लॅक स्ट्रॉ या स्टार्टअप्चे सहकार्य घेतले आहे. या यंत्रणेत संपर्कविरहित पद्धतीने तापमान आणि बॅज नोंदणी करण्यात येते. सीसीटीव्हीवर जी माहिती उपलब्ध होते, त्या माहितीचे विश्लेषण करून ती माहिती फलकावर दाखविली जाते. यामुळे मानवी हस्तक्षेप न होता सुरक्षिततेची काळजी घेता येते, असे कंपनीचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांनी म्हटले आहे.
एबीबी या बहुराष्ट्रीय कंपनीने सध्याच्या परिस्थितीत उपयोगी पडतील असे स्वीचेस व सॉकेट्स तयार केली आहेत. या ठिकाणी बॅक्टेरिया निर्माण होत नाहीत. त्यामुळे कंपन्यांमध्ये अशी उपकरणे वापरल्यास संसर्ग वाढत नाही, असे कंपनीने म्हटले आहे.