वडगाव मावळ – नेल्स थ्रेडिंग पोस्टर अर्थात खिळे-धाग्यांचे विणकाम करून राहुल ठाकरे या कलाकाराने आमदार सुनील शेळके यांची प्रतिमा साकारली. नुकतीच ही प्रतिमा त्यांनी भेट दिली.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष किरण लोहेकर, कलाकृतीकार राहुल ठाकरे, दिलीप सुतार, उमेश तंबोरे, प्रदीप तंबोरे, गणेश गाडे, गणेश सुतार, विश्व सुतार, गणेश तंबोरे, सोनल आनंदे, संतोष आनंदे, नामदेव गराडे, शिवप्रसाद सुतार, चिमणराव तंबोरे, सहादु तंबोरे, बाळासाहेब तंबोरे, बबनराव तंबोरे, बाळासाहेब सुतार, नाथा तंबोरे, दत्ता तंबोरे, बाळासाहेब गरुड, दशरथ सुतार उपस्थित होते.
आपल्या या कलाकारीसाठी राहूल ठाकरे यांची आशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर म्हणून नोंद आहे. करंजगाव (मावळ) येथील विश्वकर्मा पांचाळ समाज ट्रस्ट यांच्या सहकार्यातून तळेगाव दाभाडे येथील आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात ही कलाकृती आमदार शेळके यांना भेट म्हणून सुपूर्द केली.
यावेळी या अप्रतिम भेटीविषयी कृतज्ञता व्यक्त करताना आमदार शेळके म्हणाले की, आपल्या माणसांकडून मिळणाऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हे नेहमीच ऊर्जा देत असतात. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसाठी असलेल्या कर्तव्याची जाणीवही सतत करुन देतात. विश्वकर्मा पांचाळ समाज ट्रस्ट करंजगावच्या माझ्या मावळ्यांनी राहुल सारख्या कलाकाराला प्रोत्साहन देत तयार केलेल्या या पोस्टर मधील प्रत्येक खिळा आणि त्यात गुंफलेल्या धाग्यांसारखे आपले हे नाते अतूट राहील.