हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीने दिवाळी फराळ, नवीन कपडे वाटप
राजगुरूनगर –सामाजिक कार्यातील अग्रगण्य संस्था हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीने खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी व कातकरी कुटुंबांना दिवाळी फराळ व नवीन कपडे वाटप करण्यात आले.
हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशनच्या सर्व संचालकांनी नवीन कपडे व दिवाळी फराळसाठी वैयक्तिक आर्थिक मदत करून तसेच सर्व दानशूर व्यक्तींना आवाहन करीत भरीव मदत गोळा केली व हे कपडे व दिवाळी फराळ फाउंडेशनच्यावतीने चिखलगाव येथील सुरकुंडी, माजगांव, तांबडेवाडी येथील 200 आदिवासी व कातकरी बंधू भगिनींना वाटप करण्यात आले.
राजगुरूनगर शहरातील खेड तालुक्यातील देणगीदार यांनी जमा केलेल्या निधी आणि वस्तुरूप मदतीतून हे वाटप करण्यात आले. याप्रसंगी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप होले, उपाध्यक्षा संगीता तनपुरे, सचिव अमर टाटीया, कार्याध्यक्षा डॉ. नीलम गायकवाड, संचालक बाळासाहेब सांडभोर, संतोष सांडभोर, मधुकर गिलबिले, ऍड. मनीषा पवळे,
शिल्पा बुरसे, प्रियांका दिघे, उत्तम राक्षे, राहुल मलघे, आकाश बोंबले तसेच चिखलगावचे सरपंच शोभा गोपाळे, माझगावचे सरपंच कल्पना लोखंडे, अर्जुन सातव, उर्मिला बांगर, किसनराव गोपाळे, चिखलगावचे माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक मधुकर गिलबिले, डॉ. नीलम गायकवाड व बाळासाहेब गोपाळे यांनी तर संतोष सांडभोर यांनी आभार मानले.