नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी उलथा-पालथ होताना पाहायला मिळत आहे. कर्नाटकातील अथणी मतदारसंघातून नाराजीचा सूर समोर आला आहे. तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या लक्ष्मण सवदी यांनी भाजपाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट नाकारण्यात आल्यानंतर लक्ष्मण सवदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी ‘मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. भिकेचा कटोरा घेऊन फिरणारा मी नाही. मी एक स्वाभिमानी राजकारणी आहे.’ असे म्हणत भाजपला खोचक टोला लगावला आहे.
Former Karnataka Deputy CM Laxman Savadi resigns as the Legislative Council member and from the primary membership of the BJP after losing the Athani constituency ticket.
"I have made my decision. I am not the one who goes around with a begging bowl. I am a self-respecting… pic.twitter.com/rkXgxW0Kyf
— ANI (@ANI) April 12, 2023
प्रदीर्घ विचारमंथनानंतर भाजपने मंगळवारी रात्री कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे त्यांच्या पारंपारिक शिग्गाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर, त्यांच्या सरकारमधील मंत्री आर अशोक कनकपुरा मतदारसंघातून काँग्रेस नेते डीके शिवकुमार आणि दुसरे मंत्री व्ही सोमन्ना वरुणा विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुध्द निवडणूक लढवणार आहेत.
भाजपने 52 नवे चेहरे निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. 189 उमेदवारांच्या यादीत 32 इतर मागासवर्गीय आहेत, तर 30 अनुसूचित जाती आणि 16 अनुसूचित जमातीचे आहेत. उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकूण आठ महिलांना स्थान मिळाले आहे.