नवी दिल्ली – मेरठच्या शिखा शर्माने उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग 2022 च्या परीक्षेत यश मिळविले आहे. एका चहा विक्रेत्याची मुलगी शिखा आज पीसीएस अधिकारी झाली आहे. मुलीच्या यशाबद्दल वडील शंकरदत्त शर्मा म्हणतात की, मी हायस्कूल फेल व्यक्ती आहे, ते मुलीला ती संसाधनेही देऊ शकले नाहीत. ज्याची त्याला अभ्यासात गरज होती. तरीही त्यांनी अधिकारी होऊन माझा मान वाढवला.
शिखाचे कुटुंब मेरठ टीपी नगरमध्ये राहते. कुटुंबात वडील शंकरदत्त, आई पुष्पा शर्मा, भाऊ आणि दोन बहिणी प्रीती, वर्षा यांचा समावेश आहे. शिखा भावंडांमध्ये लहान आहे. शिखाचे वडील 20 वर्षांपासून चहाची टप्परी चालवत असून त्यातूनच कुटुंबाचा खर्च चालतो. शिखाने तिच्या संघर्षाबाबत वृत्तमाध्यमांना माहिती दिली आहे. मला माझ्या या प्रवासात माझ्या वडील आणि भावाने नेहमीच मदत केली. या परीक्षेला पास करण्यासाठी मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. काही आर्थिक प्रश्नही माझ्या पुढे होते. मी स्वतः शिकवणी घेऊन माझी फी आणि पुस्तकाचा खर्च सांभाळायचे.
माझे वडील चहाचे दुकान चालवतात. त्यातूनच आमचा घरखर्च चालतो. अभ्यासासाठी सर्व संसाधने गोळा करणे माझ्यासाठी सोपे नव्हते. आम्ही चार भाऊ बहिणी आहोत. मम्मी गृहिणी आहे. लहान भाऊ-बहिणीही अभ्यास करतात. अशा स्थितीत महागडा अभ्यास करणं खूप अवघड आहे. पण मी हार मानली नाही, माझ्या घरच्यांनीही मला साथ दिली.मी माझा वैयक्तिक खर्च अजिबात करत नाही, पण ते पैसे मी माझ्या अभ्यासासाठी वापरतो.
शिखाचे वडील शंकरदत्त शर्मा म्हणतात की,’मी हायस्कूल नापास व्यक्ती आहे. अभ्यासाले काही कळत नाही. मुलीने मिळवलेले यश हे तिच्या स्वतःच्या मेहनतीचे आहे. कारण चहा विकून मी माझ्या मुलीला आवश्यक ती साधने देऊ शकलो नाही. मेहनतीला पर्याय नाही. असे म्हटले जाते की कोविडच्या काळात मुलीला अभ्यासासाठी अँड्रॉइड मोबाईलची गरज होती. तिला अभ्यास करता यावा म्हणून मी तिच्या साठी फोनची व्यवस्था करू शकलो नाही.’