अवैध दारू वाहतूक करणारा टेम्पो पकडला  

नगर  – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने कामरगाव घाटात अवैध दारू वाहतूक करणारा टेंम्पो ताब्यात घेतला आहे. त्यामधून 18 लाख 48 हजार 400 रुपयांचा वाहनासह दारु जप्त करण्यात आली आहे.

आरोपी हितेश कुमार पुजारी यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नगर येथून पाटलाग करून कामरगाव शिवारात ट्रक (क्र.जी.जे.1.एच.टी.1262) ताब्यात घेतले. यावाहनात प्लॅस्टिकने भरलेल्या गोण्याखाली दडवून ठेवलेल्या होत्या.

यामध्ये 60 व 750 मिली क्षमतेच्या ओल्डमंकच्या सीलबंद बाटल्या या 31 हजार 200 रुपये, मॅकडॉल नं.1, व्हिस्की, ऑफिसर चॉईस, ब्ल्यु व्हिस्की, रॉयल स्पेशल व्हिस्की, किंगफशिर बिअर असा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक डी.एल जगताप, एस.एस. सराफ, ए.बी. बनकर व बी.टी घोरतळे, दुय्यम निरीक्षक डी.बी. पाटील, पी.यु. देशमुख, वर्षा घोडे व जवान ठुब आदींनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.