74 गावांतील 102 पाणी नमुने दूषित 

नगर  – जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यांच्या मासिक अहवालातून जिल्ह्यातील सुमारे 74 गावातील एकूण 102 पाणी नमुने दुषीत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. दूषित पाण्याद्वारे विविध प्रकारचे आजार पसरतात. दूषित पाणी पिल्याने नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होत असतो.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व ग्रामपंचायत या दोन विभागावर जिल्ह्यात स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागानेही याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्‍यक असताना या दोन्ही सरकारी यंत्रणांच्या चालढकल कारभाराचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द्‌ पाणी मिळावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना राबविण्यात येतात.

परंतु जलस्रोत व पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांना अशुद्ध पाणी मिळते. अनेक गावातील लोकांना अशुद्ध पाणी मिळत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. पाणीपुरवठा, ग्रामपंचायत विभाग व आरोग्य यंत्रणा यांच्यातील असमन्वय दूषित पाणीपुरवठ्याला कारणीभूत आहे.
जिल्ह्यातील सुमारे एक हजार 524 ठिकाणचे पाणी तपासलेले आहेत.
त्यापैकी 102 पाण्याचे नमुने दूषीत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. यामध्ये एकूण 74 गावांचा समावेश आहे.

दूषित पाणी असलेली तालुकानिहाय गावे :
पारनेर ः पळसपूर, कऱ्हाळवेढा, डोंगरवाडी, सावरगाव, कसारे, यादववाडी, अळकुटी, पाडळी आळे. अकोले ः कोकणवाडी, बिताका, जायनवाडी, अंबड, उंडखडक बुद्रुक, अकोले, टाकळी. नगर ः इसळक. संगमनेर ः नान्नज, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, मिरपूर, वडगावपान, मिज, देवगाव, घारगाव, कौठेकमळेश्‍वर, निळवंडे, करुले. शेवगाव ः आखातवाडे, भाविनिमगाव, जोहरापूर, ताजनापूर, सालवडगाव, खांबपिंप्री. पाथर्डी ः तोडोंळी, कोरडगाव, धामणगाव, कारेगाव, चेकेवाडी, चिंचपूरइजदे, अंबिकानगर, चितळी, तिसगाव, मीडसांगवी, जवळवाडी, कासारवाडी. राहुरी ः ब्राम्हणी. जामखेड ः जवळा, खुटेवाडी. श्रीगोंदे ः निबवी, सारळो सोमवंशी, कोरेगव्हाण, चिंभळा, लोणी व्यंकनाथ, शिरसगाव, हंगेवाडी, मढेवडगाव, बोरी, भानगाव. कोपरगाव ः कोळगाव थडी, तिळवनी, खिर्डी गणेश. नेवासे ः सोनई, खेडलेपरमानंद, शिरेगाव, पाचेगाव, बेल्हेकरवाडी. राहाता ः कोऱ्हाळे, वाकडी. श्रीरामपूर ः मांडवे, बेलापूर खुर्द, शिरसगाव, नाऊर, नायगाव, उंदिरगाव.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)