IPL 2024 (KKR vs PBKS Match 42, Toss update) : आज आयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पंजाब किंग्जशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. पंजाबचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे तर कोलकाता संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. विजयी ट्रॅकवर पुनरागमन करण्याकडे पंजाबचे लक्ष आहे. प्लेऑफच्या आशा कायम ठेवण्यासाठी आता सर्व सामने जिंकावे लागतील.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्ज संघाच्या बाजूनं लागला आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवनही या सामन्यातही खेळत नाही. त्याच्या जागी सॅम करन नाणेफेकसाठी आला होता.
🚨 Toss Update 🚨@PunjabKingsIPL win the toss and elect to bowl against @KKRiders
Follow the Match ▶️ https://t.co/T9DxmbgIWu#TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/3b5VbVdr2J
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2024
दरम्यान, हा पंजाब किंग्ज साठी ‘करा किंवा मरा’ असा सामना असू शकतो. आणखी एक पराभव पंजाबला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढू शकतो. पंजाबने चालू मोसमात आतापर्यंत 8 सामने खेळले असून त्यांना फक्त 2 जिंकता आले आहेत. त्याला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर उर्वरित 6 सामने जिंकावे लागतील. दुसरीकडे, केकेआरने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. हा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. आता त्याचे आणखी 7 सामने बाकी आहेत. अशा परिस्थितीत केकेआरने यापैकी पाचही सामने जिंकले तर त्याचे प्लेऑफचे तिकीट जवळपास निश्चित होईल. त्यामुळे केकेआर त्याच इराद्याने मैदानात उतरणार आहे.
दोन्ही संघांच्या मागील सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पंजाब किंग्जला त्यांच्या शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर केकेआरने गेल्या सामन्यात आरसीबीचा 1 धावेने पराभव केला होता.