नाशिक : राज्यात एकीकडे एसटी कर्मचाऱ्याच्या समस्या काही केल्या संपत नाहीत. दुसरीकडे राज्यात ऐन दिवाळ सणाच्या तोंडावर लासलगाव आगारात एका हृदयद्रावक घटना घडली आहे. बसला कंटेनरच्या धक्का लागला, हे पाहण्यासाठी खाली उतरलेल्या चालकाला कंटेनरने फरफटत नेले. दरम्यान, या घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
आज सकाळी आगारात लासलगाव ते तुळजापूर एम एच 14 _ 36 41 ही बस प्रवेश करत असताना कंटेनर नंबर एम एच वाय 4763 ने धक्का दिला. त्यामुळे बसचा चालक एस. पी.निकम यांनी खाली उतरून पाहणी करण्यास सुरुवात केली. मात्र याच वेळी अचानक कंटेनरने चालक एस. पी.निकम यांना फरफटत नेले. दरम्यान, हा अपघात एवढा भीषण होता कि चालक एस. पी.निकम यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले. दरम्यान, या दुर्घटनेमुळं संतप्त बसचालक व वाहक तसेच बस आगारातील कर्मचारी संतप्त झाले व बस सेवा बंद पडली.
नाशिक येथून बसचालक एस. पी.निकम हे लासलगाव येथे आले. सकाळी बस स्थानकावर चालक एस. पी.निकम यांनी आगाराचे व्यवस्थापक समर्थ शेळके व राजेंद्र दारके यांचे सह चहा घेतला व आगारातून बस स्थानकात रस्त्याने आत घेत असताना बसला केंटरने धक्का दिला व अपघात झाला. हा कंटेनर चालक भरधाव वेगाने बस स्थानक ते गुंजाळ पेट्रोलपंपासमोर असलेल्या अमित नंदकुमार बिरार व सलिमभाई कलर वाले यांचे दुकानांना धडका देत व एका स्कूटी गाडीला धडक देत हा कंटेनर थांबला. या अपघातात चालक निकम यांचे मृतदेहाचा रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. ही घटना समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे कर्मचारीसह दाखल झाले व निकम यांच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करून अंबुलंसमध्ये टाकला.
सध्या बस चालक वाहकांच्या संप सुरू होता परंतु काल बससेवा सुरू झाली. आज बस कर्मचारी परत संपाचे मानसिकतेत होते. परंतु दिवाळीमुळे बस सुरू करतात अशी विनंती करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व बस आगार प्रमुख समर्थ शेळके यांचेत चर्चा झाली त्यानुसार आज सकाळी सहा वाजेपासून बसेस सुरू झाल्या व ही दुर्घटना घडली.