मुंबई – ड्रग्ज केस प्रकरणी मागील 26 दिवसांपासून पोलीस कोठडीत असणाऱ्या ‘आर्यन खान’ची अखेर आज (दि. 30) तुरुंगातून सुटका झाली आहे. दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला.
View this post on Instagram
सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न होता आपल्या घरी मन्नतवर होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
View this post on Instagram
दरम्यान,‘स्टे स्ट्राँग, प्रिन्स आर्यन’ असा हातात फलक घेऊन काही चाहते उभे आहेत. एका बाबाने तर आर्यनसाठी मन्नत बाहेर ‘हनुमान चालिसा’चे पठण केले. सध्या आर्थर रोड कारागृहाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी आहे. कारागृहाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे.